vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र

राज्य प्रतिनिधी 

प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे तर्फे सर्व पासपोर्ट अर्जदारांच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बाणेर, पुणे येथे बुधवार, 8 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत जनसंवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. या जनसंवाद सत्राच्या नोंदणी प्रक्रियेसाठी अर्जदारांनी दुपारी 1.30 वाजता उपस्थित राहावे, असे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 जनसंवाद सत्रादरम्यान पासपोर्ट अर्जदारांना त्यांच्या पासपोर्ट अर्जांशी संबंधित शंका/ तक्रारींबाबत प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येईल. जनसंवाद सत्र दरम्यान प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे येथे भेट देऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी त्यांच्या तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी आक्षेप पत्र तसेच संबंधित सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…

उद्योग, व्यवसाय व आस्थापनांनी मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ३१ जानेवारी पर्यंत सादर करण्याचे आवाहन…

समाजसेविका कल्पना शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या तालुक्याच्या वतीने सन्मान