vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

ठाणे, प्रतिनिधी(जिल्हा परिषद ठाणे) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राज्यभर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवार, दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता काढण्यात येणार आहे. ही सोडत संगणकीय प्रणालीद्वारे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून पात्र विद्यार्थ्यांची निवड याद्वारे करण्यात येईल.

या प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या पालकांना सोडतीचा निकाल अधिकृत आरटीई पोर्टलवर पाहता येणार आहे. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक व ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला समान संधी मिळावी हा शासनाचा उद्देश आहे. प्रशासनाकडून सोडत प्रक्रिया सुरळीत, विश्वासार्ह व निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.”तसेच त्यांनी पालकांना आवाहन केले की, कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा मध्यस्थांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत संकेतस्थळ व शासकीय माध्यमांवरूनच माहिती घ्यावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे.

सोडतीनंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळेत निश्चित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित जागा पुढील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेआरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित महानगरपालिका शिक्षण विभाग / तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

०००

संबंधित पोस्ट

नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यावर592 कोटी 34 लाखाची मदत डीबीटीद्वारे वर्ग बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थींच्या खात्यात 1 कोटींची रक्कम जमा पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

लाभार्थ्यांनी 20 तारखेपर्यत रास्तभाव धान्य दुकानातुन धान्य उचल करावी

vishwatmaklokswamivarta

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे निर्देश

जमीन आरोग्य व्यवस्थापनासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक :डॉ संग्राम काळे*

vishwatmaklokswamivarta

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस !बिनशर्त माफी मागा; अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा – सनातन संस्थेचा पृथ्वीराज चव्हाण यांना इशारा..