vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड-सर्वोत्कृष्ट शाखा बनविण्याबरोबरच नाट्यसंमेलन ठाण्यात घेण्याचा म्हस्के यांचा निर्धार

नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या अध्यक्षपदी खासदार नरेश म्हस्के यांची निवड-सर्वोत्कृष्ट शाखा बनविण्याबरोबरच नाट्यसंमेलन ठाण्यात घेण्याचा म्हस्के यांचा निर्धार

ठाणे प्रतिनिधी- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेच्या रविवारी झालेल्या विशेष बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांची संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. या बैठकीला नाट्यपरिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष (प्रशासन) नरेश गडेकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके आणि नियामक मंडळ सदस्य शिवाजी शिंदे हे निरीक्षक उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या याआधी असलेल्या परंपरेला पुढे नेत, अधिक जोमाने आणि नवीन दृष्टिकोनातून काम करत, ठाणे शाखेला सर्वोत्कृष्ट बनविण्याचा निर्धार यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. ठाणे शाखेचे नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळं स्थान निर्माण करून देण्यासाठी कलाकार, निर्माते, रंगमंच व्यवस्थापक आणि कामगार या सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आगामी काळात ठाण्यात आणखीन एक नाट्यसंमेलन आयोजित करण्याची मागणी मध्यवर्ती शाखेकडे केली.

ठाणे शाखेच्या नवीन कार्यकारणी मध्ये नरेंद्र बेडेकर (कार्याध्यक्ष), मोहन पवार(उपाध्यक्ष-प्रशासन), यतीन ठाकूर (उपाध्यक्ष-उपक्रम), दुर्गेश आकेरकर (प्रमुख कार्यवाह), महेश सावंत पटेल, निशिकांत महांकाळ (सहकार्यवाह), अंबरीश ओक (कोषाध्यक्ष), महेश शानबाग(सहकोषाध्यक्ष) यांच्यासह कार्यकारीणी सदस्य मकरंद जोशी, प्राची डिंगणकर, आदित्य संभूस, श्रृतिका मोरेकर, वृंदा दाभोळकर, वरदायिनी दिवेकर यांचा समावेश आहे. बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष ठाण्याचे रंगकर्मी राजू तुलालवार हे प्रमुख सल्लागार असतील, अशी माहिती संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

00000

संबंधित पोस्ट

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

नांदेड- मुंबई ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

जालना येथील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज करावेत

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी*