vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

15एप्रिल,2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

15एप्रिल,2026 रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

           नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई, :- कोंकण विभागातील पेन्शन अदालत दरमहा दुसऱ्या मंगळवारी आयोजित करण्यात येते. तथापि एप्रिल 2026 महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने एप्रिल, 2026 या महिन्यात विभागीय पेन्शन अदालत बुधवार दि. 15 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 12.00 वा. कोकण भवनातील कक्ष क्र. 106 सामान्य प्रशासन शाखा, विभागीय आयुक्त कार्यालय कोंकण भवन येथे आयोजित केली आहे.    या पेन्शन अदालतीमध्ये महसूल विभागातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन प्रकरणांच्या अडचणींचे निवारण करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रकरणांबाबतच्या तक्रारी असल्यास सदर दिवशी त्याबाबतचे अर्ज स्वीकारले जातील. कोकण विभागातील पेन्शन धारकांनी या पेन्शन अदालतीला उपस्थित राहून पेन्शन विषयी आपले प्रश्न उपस्थित करावे, असे कोकण विभाग तहसिलदार (सामान्य प्रशासन) गजानन धुमाळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.000 000

संबंधित पोस्ट

डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे एक पेन एक वही महापरिनिर्वाण दिनी शैक्षणिक उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान पोष्टरचे जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते विमोचन

vishwatmaklokswamivarta

जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी डिजीटल प्रक्रियेत अधिक अद्ययावतीकरणाचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta

कल्याण तालुक्यातील कांबागाव येथील जमीन हस्तांतरण नियमानुसार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे