vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे

या परीक्षेत विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे

या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिला खुल्या प्रवर्गामधून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांचा सविस्तर निकाल तसेच प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट आहे.

वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येणार असल्याचेही आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

सस्ती अदालत उपक्रमासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना-विभागीय आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक जारी

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले

vishwatmaklokswamivarta

शीख बांधवाना विवाह नोंदणी करण्याचे आवाहन

एसटी’ महामंडळात मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त कार्यरत अधिकाऱ्यांची बदली करा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta