vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी, प्रतिनिधी : जगासाठी उत्तुंग नेतृत्व असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी शासकीय तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल. त्यासाठी शासन मागे पहाणार नाही. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. पुढच्या जयंतीला जिल्ह्यातील पाचही संविधान भवनांचे लोकार्पण करु, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी पूर्णपणे सहकार्य लाभेल. अभिमान वाटेल असे काम केले जाईल. बाबासाहेबांची जयंती समाजातील सर्व घटकांची आहे. या विचाराचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करु, असे महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. सामंत आणि राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबासाहेबांच्या अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला

मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने साजरी करण्यात आली. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. सामंत आणि राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बाबासाहेबांच्या अस्थिकलश स्थानीही पुष्पहार अर्पण करण्यात आला.यांनतर झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून शासकीय जयंती साजरी होतेय, याचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांमुळेच मी आमदार, मंत्री होऊ शकलो. जागतिकस्तरावरचे स्मारक या ठिकाणी होईल. देशातील, परदेशातील अनुयायी, अभ्यासक या गावी भेट देतील. बाबासाहेबांचे विचार युवा पिढीपर्यंत या स्मारकाच्या माध्यमातून पोहचतील. बाबासाहेबांचा विचार हा फक्त एका समाजाचा नाही, तो देशाच्या एकसंघतेचा आहे. ज्या लंडनवाल्यांनी आपल्या देशावर राज्य केले. तेथेच बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यात आले आहे. हे स्मारक खास पाहण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. युद्ध नको बुद्ध हवा ही किमया बुध्दांची आहे. बुध्दांचा, बाबासाहेबांचा हाच विचार पुढे घेऊन गेलो तर जयंतीचे सार्थक आहे.बुध्दांच्या शांततेचा, बाबासाहेबांचा विचार युवा पिढीसमोर ठेवण्यासाठी रत्नागिरीतही बौध्दविहार निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी 10 कोटी रुपये दिले आहेत. नगरपरिषदेनेही बौध्द विहार असा ठराव पास केला आहे. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. दुर्दैवाने आपण संघटीत होत नाही. बाबासाहेबांचे संविधान शिकले पाहिेजे, अन्यायाविरोधात संघटिक झाले पाहिजे. विधायक कामांसाठी, देशभक्तीसाठी आणि समाजाप्रती संघर्ष करायला शिकले पाहिजे, असेही पालकमंत्री म्हणाले.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रिपेड टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे नवे भाडेदर जाहीर…

vishwatmaklokswamivarta

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

जिल्हाधिकारी कार्यालयात सदविचारांचे वाण-सणांद्वारे संवाद आणि संस्कार वृद्धिंगत व्हावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

सीएनजी महागला , सीएनजीच्या दरात आज दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून ही वाढ लागू 

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर