vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

युवकांसाठी किनवट येथे शिका आणि कमवा अंतर्गत 23 एप्रिल रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

नांदेड, प्रतिनिधी: बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट व आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि. कंपनीमार्फत तरुणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम प्लेसमेंट ड्राईव्ह 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे आयोजीत केले आहे.

युवकांना तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा.लि.यांनी “टोयोटा कौशल्या” तरुणांसाठी टोयोटाचा शिका आणि कमवा अंतर्गत कौशल्य विकास उपक्रम हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार असुन त्यांचा कौशलय विकासावर विशेष भर दिला जाणार आहे.या उपक्रमाअंतर्गत शुन्य खर्चात डायरेक्टरेट जनरल ट्रेनिंग ( DGT) च्या सहकार्याने निवासी जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. 2 वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 1 वर्ष शिकाऊ प्रशिक्षणासाठी पात्र व 1 वर्ष शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधीसाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे.या उपक्रमाअंतर्गतचे कोर्सेस :- 1) वाहन वेल्ड तंत्रज्ञ 2) वाहन रंगकाम तंत्रज्ञ 3) वाहन जोडणी तंत्रज्ञ 4) मेकाट्रॉनिक्स तंत्रज्ञ.

 या कोर्सेससाठी पात्रता वय 18 ते 21 वर्षे असणे आवश्यक शिक्षण 10 वी 12 वी पास असणे आवश्यक, वैवाहिक स्थिती अविवाहीत असणे आवश्यक. या उपक्रमाअंतर्गत विद्यावेतन व सुविधा विद्यावेतन ( प्रथम वर्ष ) 15 हजार 815 रुपये प्रति महिना, ( व्दितीय वर्ष) 17 हजार 615 रुपये प्रति महिना, मूलभुत सविधांसह राहण्याची व जेवणाची व्यवस्था, सुरक्षिता व देखरेखसाठी चोविस तास वार्डन असणार आहे.

तरी सर्व बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा आवश्यक लाभ द्यावा, असे आवाहन किनवटचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सु.गो.चव्हाण यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

स्वच्छताकार्यासह मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवस कृती आराखडयाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्याकडून आढावा

vishwatmaklokswamivarta

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल चौकशी करण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सानपाडा नवी मुंबई पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामास मंजुरी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु….