vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन 

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदविण्याचे युवक-युवतींना आवाहन

नांदेड प्रतिनिधी :- भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी 18 ते 25 वयोगटातील पूर्ण वेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवावर्ग पात्र आहे. या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना ६ ते ९ महिन्यांचे प्रशिक्षण (इंटर्नशिप) दिले जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा आर्थिक सहायता 9 हजार रुपये व एकरकमी सहायता 6 हजार रुपये देण्यात येणार आहे.

या इंटर्नशिप योजनेअंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवरील Register now या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकास मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असून आधार लिंक मोबाइल क्रमांक वर ओटीपी पाठवण्यात येतो त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होऊ शकते.

जिल्ह्यातील 18 ते 25 वयोगटातील जास्तीत पात्र युवक-युवतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी व अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे ईमेल आयडी nandedrojgar01@gmail.com दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश – सहपालकमंत्री ना. संजय सावकारे * शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी आणि साधला संवाद* सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या अतिवृष्टीग्रस्त भागांची केली पाहणी..

vishwatmaklokswamivarta

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन- जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा…

जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न निधी अखर्चित राहिल्यास संबंधित विभाग प्रमुखाला जबाबदार धरणार   – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर येथे 7 सप्टेंबरला डाक अदालत डाक सेवेसंदर्भातील तक्रारी 4 सप्टेंबरपूर्वी पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मंत्रालय प्रवेशासाठीच्या एफआरएस तंत्रज्ञानामुळे सुरक्षितता, पारदर्शकतेमध्ये होणार वाढ

vishwatmaklokswamivarta