vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा

मंगळवारपासून प्रत्येक पंचायत समितीत रोजगार मेळावा

     अमरावती, प्रतिनिधी: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमेंतर्गत मंगळवार, दि. 21 एप्रिलपासून दि. 8 मेपर्यंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हा रोजगार मेळावा होणार आहे.    मेळाव्यामध्ये हैद्राबाद येथील गार्डियन ट्रेनिंग अकादमीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येते. कंपनीला आवश्यक असलेल्या पात्रतेच्या पदासाठी सदर कंपनीचे प्रतिनिधी लेखी परीक्षा घेऊन मुलाखती घेतील.

मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066, 8983419799, 8605654025 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा उद्योगक केंद्राकडून विविध तांत्रिक व उद्योजकता विषयी मोफत प्रशिक्षण-इच्छुक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

vishwatmaklokswamivarta

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

 स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

vishwatmaklokswamivarta

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

बंद उद्योग घटकांनी एक महिन्याचा आत उद्योग सुरू करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta