जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाची व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल..
व्यवसायिक प्रतिनिधी-मुरुड-जंजिरा या तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीतील 10 महिला एकत्र येऊन दि.09 जून 2018 रोजी जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाची स्थापना केली. महिलांच्या एकत्रिकरणाने त्यांच्यामधील एकत्रितपणाची भावना वाढत गेली. सुरुवातीच्या काळात या समुहामध्ये फक्त मासिक वर्गणी जमा करणे व जमा केलेली वर्गणी गटातील सदस्यांना गरज पडत असल्यास अंतर्गत कर्ज म्हणून देणे हे काम केले. या समुहाने स्वच्छ अभियान पोषण महासप्ताह व कोविड-19 अशा कार्यक्रमामध्ये भाग घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचेही काम केले आहे.कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये गावातील सर्व महिलांची सभा घेण्यात आली या सभेत जय मल्हार महिला स्वयंसहायता समुहाचा उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामध्ये समावेश करण्यात आला. या सभेत सर्व महिलांना अभियानाचे महत्व, योजना, दशसुत्री या सर्वांची माहिती देण्यात आली. त्यानंतर अभियानांतर्गत जय मल्हार महिला स्वयंसहायता समूहाची MIS ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली. जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाकडुन फॉर्म भरुन रक्कम रु.15000/- फिरता निधीचा लाभ घेतला. तसेच जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुह हा एकता महिला ग्रामसंघास 2019 मध्ये जोडला गेला आहे.
जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाने अभियाना मार्फत बँक कर्जासाठी फॉर्म भरुन सन-2019 मध्ये पहिले रक्कम रु. 1,00,000/- एवढे बँकेकडून कर्ज प्राप्त करुन घेतले. यामधून महिलांनी पुरणपोळी बनविणे व चिकी व्यवसाय सुरु करुन समुहाला व आपल्या कुटूंबाला आर्थिक मदतीचा लावण्याचे ठरविले.जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुहाने व्यवसाय करण्याचे ध्येय ठेवून पुरणपोळी बनविणे व चिकी व्यवसाय करण्यावर समुहातील महिलांनी भर दिला. कारण कोर्लई हे गाव समुद्राच्या बाजुला वसलेले असल्याकारणाने व कोर्लई किल्ला हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असल्याने जय मल्हार महिला स्वयंसहाय्यता समुहाने पुरण पोळी व्यवसाय करण्याचे ठरविले. तसेच जवळच्या गावात घरपोच पुरण पोळी नेऊन देणे तसेच गावातील विविध कार्यक्रम समारंभांना पुरण पोळी पोहचविण्याचे कार्य जय मल्हार समुह करीत आहे.जय मल्हार महिला स्वयंमसहाय्यता समुह हा नेहमी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व त्यांच्या यंत्रणेचा ऋणी आहे. कारण अभियानाच्या हातभाराने समुह आपले यश प्राप्त करु शकला आहे.
समुहातील महिलांची एकतत्रितपणा, एकमेकांना हातभार लावणे. महिलां मधील व्यावसाय करण्याची चिकाटी, तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या यंत्रणने दिलेला हातभार यामुळे या समुहाने आपले यश संपादन केले आहे.
श्रीमती संजीवनी जाधव सहायक संचालक, विमाका, नवी मुंबई तथा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग