vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांकरिता महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

          रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग आणि वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड, यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 एप्रिल 2026 रोजी वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड ता.महाड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.

          जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. सदर मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी ,आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.

             रोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत रावविण्यात येत असलेल्या कर्ज योजनां ‍विषयाची माहिती दिली जाईल, जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. तसेच रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी यारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.

           संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.

०००००००

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ;कर्ज योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाला गती;जिल्ह्यात 423 तरुणांच्या उद्योगांना बँकेचे बळ

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षेचेआवेदनपत्र स्विकारण्याकरिता दि.15 एप्रिल 2025 पर्यंत मुदतवाढ..

राज्यभरात १० हजारांहून अधिक उमेदवारांना मिळणारआज नियुक्तीपत्रे; जिल्ह्यातील २९६ जणांचा समावेश

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर – 

vishwatmaklokswamivarta