vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे 

भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

जालना प्रतिनिधी-जालना शहरातील बालाजी चौक येथे चर्मकार समाजाच्या वतीने “बालाजी महाराज चौक” या चौकास जगद्गुरु श्री संत रोहिदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी १५ एप्रिल २०२६ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.मात्र, संबंधित चौकाचे “बालाजी महाराज चौक” असे नामकरण पूर्वीच मंजूर झाल्याने त्याच चौकास दुसरे नाव देणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जालना शहरातील अन्य योग्य ठिकाणी संत रोहिदास महाराज यांच्या नावाने चौक नामकरण व स्मारक उभारणीचा ठराव घेण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, उपोषणस्थळी भेट देत भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. येत्या मे महिन्यातील सर्वसाधारण सभेत योग्य ठिकाण निश्चित करून पुढील १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले

या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले. यावेळी समितीचे श्री. अशोक भगुरे, श्री. योगेश बिल्लोरे, दिनेश लामकाने, सचिन इरछे, विकास बिल्लोरे, संतोष कुरील, विनोद आक्से यांनी पाणी प्राशन करून उपोषण सोडले.

या प्रसंगी भाजपा गटनेते श्री. महेश निकम, नगरसेवक श्री. सिद्धिविनायक मुळे, जीवन सले, अजित मानधानी, कल्याण भदनेकर, श्री. महुने सर तसेच शहर अभियंता श्री. सौद आदी उपस्थित होते.

0000

संबंधित पोस्ट

आषाढीवारी 2025..!मानाच्या पालख्या, वारकरी अन्  भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट…

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक,उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.संपर्क समन्वय योजना तयार करुन आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश…

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी अर्ज मागविले.

कौशल्य विषयक प्रशिक्षण उपक्रमांतून देहविक्रय करणा-या महिलांसाठी विकासाच्या नव्या संधी..

⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला .पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी