vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

जालना, दि. २४ : देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांपैकी एक असलेली जनगणना २०२७ जालना जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १ एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत पार पडणारी ही जनगणना अधिक आधुनिक, डिजिटल आणि तपशीलवार स्वरूपात होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या जनगणनेचे दोन मुख्य टप्पे असणार आहेत. पहिल्या टप्प्यात घर सूचीकरण व गृहनिर्माण जनगणना (House Listing Phase) तर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना (Population Enumeration Phase) केली जाणार आहे

१६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला प्रारंभ

घर सूचीकरणाचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्यात प्रत्येक घराची सविस्तर माहिती गोळा केली जाणार असून, साधारण १८० ते २०० घरे किंवा ७०० ते ८०० लोकसंख्या या निकषावर प्रगणक काम करणार आहेत.

या अंतर्गत घराचे बांधकाम, वापर, स्थिती, कुटुंबातील सदस्यांची संख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, जात, तसेच पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, इंटरनेट, लॅपटॉप, वाहने अशा सुविधा व मालमत्तेची माहिती १ ते ३४ प्रश्नांद्वारे संकलित केली जाणार आहे. जनगणना कायदा १९४८ अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणे नागरिकांसाठी बंधनकारक आहे.

२८१८ प्रगणकांची नियुक्ती.

जालना जिल्ह्यात एकूण २८१८ घर सूचीकरण ब्लॉक्स (HLBs) निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी २८१८ प्रगणक आणि ४७० पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे प्रगणक HLO मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने नागरिकांकडून माहिती संकलित करणार असून, ही सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाला सुरुवात

जनगणना प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने प्रशिक्षणावर भर दिला आहे. मार्च व एप्रिल २०२६ मध्ये ६१ फील्ड ट्रेनर्सना जिल्हास्तरावर मास्टर ट्रेनर्समार्फत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर २३ एप्रिल ते ८ मे २०२६ या कालावधीत प्रगणक व पर्यवेक्षकांना तीन दिवसीय प्रशिक्षण विविध टप्प्यांत दिले जात आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रीय सरावही घेण्यात येत आहे.

स्वगणना सुविधा उपलब्ध

यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल असल्यामुळे नागरिकांसाठी स्वगणना (Self-Enumeration) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिकांना se.census.gov.in या पोर्टलवर लॉगिन करून स्वतःची माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर नागरिकांना एक युनिक आयडी मिळणार असून तो संबंधित प्रगणकास सादर केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होईल.

फेब्रुवारी २०२७ मध्ये लोकसंख्या गणना

दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष लोकसंख्या गणना (Population Enumeration) फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे. या टप्प्यात नागरिकांची वैयक्तिक माहिती जसे वय, लिंग, शिक्षण, धर्म इत्यादींची नोंद केली जाणार आहे.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन

जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, शासनाच्या विविध योजनांचे नियोजन याच माहितीवर आधारित असते. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व परिणामकारक होणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

माझी वसुंधरा अभियान 5.0′ मध्ये 10 लक्ष लोकसंख्येपेक्षा मोठ्या शहरांच्या अमृत गटात नवी मुंबई राज्यात व्दितीय**’माझी वसुंधरा अभियान ‘4.0’ आणि ‘5.0′ मध्ये व्दितीय क्रमांकाचे 2 पुरस्कार प्रदान**‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ मध्ये ‘भूमी’ थीमॅटिक स्पेशल कॅटेगरीत सर्वोत्तम कामगिरी पुरस्कार*

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

एमपीएससी गट-ब परीक्षेसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना; अर्ज करण्याचे आवाहन

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

जमीन न मिळालेल्या कोयना धरणग्रस्तांनी जमिनीसाठी अर्ज करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

आषाढीवारी 2025..!मानाच्या पालख्या, वारकरी अन्  भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट…