vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

ठाणे, प्रतिनिधी(जि.प. ठाणे): महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत २८ एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार यावर्षी दि. २८ एप्रिल, २०२६ रोजी जिल्हा परिषद ठाणे येथे सेवा हक्क दिनानिमित्त शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

जिल्हास्तरावर आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्रांगणात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शपथ घेतली. नागरिकांना शासकीय सेवा पारदर्शक, वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) पंडित राठोड, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, उप मुख्य व लेखा अधिकारी अंजली अंबेकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) भाऊसाहेब मोहिते तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेकार्यक्रमात सर्व उपस्थितांनी खालीलप्रमाणे शपथ घेतली:

“मी, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने, विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.मी सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी आवश्यक पावले उचलेन.

मी नागरिकांना कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून सेवा भावनेतून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ कार्य करेन.”‘सेवा हक्क दिना’च्या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता यांना प्राधान्य देत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचा पुनरुच्चार केला. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

000

संबंधित पोस्ट

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर

vishwatmaklokswamivarta

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान .

ठाणे शहरात 3 बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta