vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

राज्य प्रतिनिधी-राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनाचा अचूक खर्च काढण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी आपापल्या क्षेत्रातील पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत दिले.

राज्य मूल्य आयोगाकडून शेतीमालाचा रास्त भाव आणि उत्पादन खर्च निश्चित केला जातो. मात्र, हवामान बदलामुळे बियाणे, खते, मजुरी आणि उत्पादकता यामध्ये मोठे बदल झाले आहेत. हे लक्षात घेऊन राहुरी, अकोला, परभणी आणि दापोली या चारही कृषी विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यांमधील प्रमुख पिकांचा अभ्यास करावा. वाढलेली मजुरी, कीड-रोगांमुळे होणारा अतिरिक्त फवारणी खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे घटलेली उत्पादकता यांचा विचार अहवालात व्हावा, अशा सूचना कृषी मंत्री भरणे यांनी दिल्या

मंत्रालय परिषद सभागृह येथे झालेल्या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार राजेश बकाने, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक सुनिल बोरकर यांच्यासह सर्व कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

ॲडव्हान्टेज महा.एक्स्पो-२०२६ च्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रक्षीक्षण संपन्न

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग

vishwatmaklokswamivarta

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मोफत हेल्मेट वाटप

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या 23 कोटी 26 लक्ष रुपयांच्‍या अर्थसंकल्‍पास मंजूरी;सक्षम महिला, आधुनिक शेती, शिक्षण व आरोग्यातून गावांचा सर्वांगीण विकास..