vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईकरांसाठी बातमी रविवारी नाही तर आज रात्री असणार मेगा ब्लॉक, NEET विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबईकरांसाठी बातमी रविवारी नाही तर आज रात्री असणार मेगा ब्लॉक, NEET विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई प्रतिनिधी: दर रविवारी मुंबईमध्ये लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक असतो. याकाळात मेंटेनन्सचं काम केलं जातं. पण या आठवड्यात रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार नाहीये.  NEET UG 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी नेहमीप्रमाणे मेगा ब्लॉक घेतला जाणार नाही. मात्र देखभाल आणि तांत्रिक कामांसाठी आज (शनिवार-रविवार मध्यरात्र) मुंबईतील विविध मार्गांवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर कुठे आणि कधी ब्लॉक?मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून आज मध्यरात्री ब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान मुख्य मार्गावर ब्लॉक असणार आहे. वेळ रात्री 12:05 ते पहाटे 5:05 असा ब्लॉक असणार आहे. या काळात स्लो लाईनवरील गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात येतील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला येथे ट्रेन थांबतील.

ट्रान्स-हार्बर लाईनवर कसा परिणाम?  ठाणे रेल्वे स्टेशन ते वाशी रेल्वे स्टेशन / नेरुळ रेल्वे स्टेशन दरम्यान सेवा प्रभावित होणार आहे. काही गाड्या पूर्णपणे रद्द राहतील.  ठाणे–पनवेल/नेरुल मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी व्यवस्था लक्षात घ्यावी.

शेवटच्या आणि पहिल्या लोकल गाड्याशेवटची डाउन लोकल: CSMT–टिटवाळा (रात्री 11:16)शेवटची अप लोकल: टिटवाला–CSMT (रात्री 10:22, कल्याणहून)ब्लॉकनंतर पहिली डाउन लोकल: CSMT–कसारा (पहाटे 5:07)पहिली अप लोकल: टिटवाला–CSMT (पहाटे 4:12)पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक

पश्चिम रेल्वेकडून मेट्रो लाईन-6 च्या कामासाठी राम मंदिर रेल्वे स्टेशन ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशन दरम्यान मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. याची वेळ रात्री 9:30 ते सकाळी 7:30 (10 तास) अशी असेल . काही गाड्या वळवण्यात येतील, तर काही सेवा रद्द राहतील.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना,रविवारी ब्लॉक नसल्यामुळे NEET परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र आज मध्यरात्री प्रवास करणाऱ्यांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, कारण अनेक गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत किंवा सेवा रद्द असू शकतात.

0000

संबंधित पोस्ट

संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार

बालकांच्या आधारवरील बायोमेट्रीक अद्यावतीकरणासाठी मोहीम

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपण

कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव हा पणन मंडळाचा स्तुत्य उपक्रम- चित्रपट अभिनेते राहूल सोलापूरकर

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

मुंबई महानगरपालिका माटुंगा बीएमसी एफ/उत्तर वॉर्डने बेकायदेशीर दुकानांवर कारवाई केली: ५२ अतिक्रमणे हटवली.

vishwatmaklokswamivarta