vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पहाणी

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची दखल

राज्य प्रतिनिधी – लातूर येथे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूर येथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटर नाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पाणी केली. तसेच दावतपूर येथे अभिसरणातून उभारण्यात आलेली अंगणवाडी इमारत, कांदाचाळ, जनावरांचा गोठा यासह विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच याठिकाणी नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. येथील अमृत तलाव संवर्धन कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थांशीही संवाद साधला

पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार दिनकर माने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, औसा पंचायत समिती सभापती गंगाबाई कोदळीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी जावेद पटेल, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

****

संबंधित पोस्ट

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ 

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील,जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा..

ऑनलाईन जुगारावर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार ! – गोवा व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !ऑनलाईन जुगारावर नियंत्रणासाठी राष्ट्रव्यापी कायदा करण्याची सुराज्य अभियानाची मागणी..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना दिलासा देणारी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’

vishwatmaklokswamivarta