vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कॅनमधून पेट्रोल-डीझेल विक्री करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा पुरवठा निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘एचपीसीएल’ची मोठी कारवाई

कॅनमधून पेट्रोल-डीझेल विक्री करणाऱ्या दोन पेट्रोल पंपांचा पुरवठा निलंबित; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ‘एचपीसीएल’ची मोठी कारवाई

राज्य प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर नियमांचे उल्लंघन करून कॅन आणि बॅरलमध्ये पेट्रोल-डिझेलची विक्री होत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. तसेच याबाबत जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या पत्राची दखल घेत हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जिल्ह्यातील दोन पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने निलंबित केला असून या पंपांची लवकरच सखोल चौकशी केली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर ग्राहकांना जार, कॅन किंवा बॅरलमध्ये डिझेल आणि पेट्रोल दिले जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी डॉ. बास्टेवाड यांना प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, अशा प्रकारे सुट्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने एचपीसीएल कंपनीला दिली.

लातूर जिल्ह्यात पेट्रोल-डीझेल विक्रीबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कॅन किंवा बॅरलमध्ये पेट्रोल-डीझेल नेणे धोकादायक असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर बंदी घातली आहे. जर इतर कोणत्याही पेट्रोल पंपावर असे नियमबाह्य प्रकार आढळून आले, तर त्यांच्यावरही अशाच स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे.

*****

संबंधित पोस्ट

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta

जिल्हा व सत्र न्यायालयातील वापरात नसलेल्या वस्तुंचा 24 जुलै रोजी लिलाव

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे