vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दसरा चौकातील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय रोठोड यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. गेली ४५ वर्षे ट्रस्टच्या स्थापनेपासून दरवर्षी हा अभिवादनाचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून, राजर्षींच्या सामाजिक विचारांना अभिवादन करण्याची परंपरा जपली जात आहे.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पोलीस अधीक्षक नोलोत्पल, विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, विश्वस्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे सदस्य सचिव गजानन गुरव, विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि व्यवस्थापक डी. एम. नांगरे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, उपस्थित होते. दसरा चौकातील अभिवादनानंतर शाहू स्मारक येथे अर्धाकृती पुतळ्यालाही पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी ट्रस्टच्या कामकाजाबाबत चर्चा व येणाऱ्या जयंती दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची चर्चा झाली.

सन १९८१ मध्ये स्थापन झालेल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टमार्फत राजर्षी शाहू महाराजांची जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा प्रसार, कोल्हापूर पर्यटनाला चालना तसेच साहित्य, कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शाहू समाधी स्थळाला भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

 

00000

संबंधित पोस्ट

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

३४ हजार ७३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती;सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कुंभमेळ्याच्या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; विभागांनी जबाबदारीने काम करा

ठाणे जिल्ह्यातील रिक्त 1 हजार 223 आपले सरकार सेवा केंद्रासाठी दि.31 जुलै 2025 पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाच्या कामकाजाला गती देऊ — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल, डिझेल व एलपीजी पुरवठा सुरळीत-अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत