vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)

राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (दि. ९)

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने शनिवार दि. ९ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांसह जिल्हा व सत्र न्यायालयात ही लोकअदालत पार पडणार आहे.

दुरावलेले संबंध, प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये तडजोडपात्र दिवाणी, फौजदारी, बँक वसुली, कामगार वाद, वीज व पाणी देयक, पैसे वसुली, भूसंपादन, महसूल, कामगार व औद्योगिक वाद तसेच वैवाहिक वादासंदर्भातील विविध प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी संबंधितांनी आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित आहेत त्या न्यायालयात अर्ज करावा. दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे ८५९१९०३६२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश गिरीश रा. अग्रवाल तसेच सचिव श्रीमती वैशाली पी. फडणीस यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

तुळजापूरच्या श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 1 हजार 865 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता–अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाचा शासननिर्णय जारी…

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजनक्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार..

vishwatmaklokswamivarta