vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 मे च्या सकाळी 6 वाजेपासून ते 26 मे 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल.

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

खतटंचाईचा मुद्दा गंभीर, कृषी विभागाकडून दुर्लक्ष; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा…

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून अनावश्यक प्रवास टाळावा; संपूर्ण शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष अलर्ट मोडवर असल्याचे मुख्यमंत्री यांचे विधानसभेत निवेदन..

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

शेवटच्या घटकाचा विचार हाच खरा न्याय – न्यायमूर्ती अनिल किलोर बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

मधुमित्र व मधुसखी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta