vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पूर्णा नदीवरील साखळी बंधाऱ्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, प्रतिनिधी : पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे (छत्रपती संभाजीनगर) तसेच भराडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पुनर्नियोजन अंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्षेत्रात सिंचन क्षमता वाढ होणार असल्याने ही कामे कालमर्यादेत पूर्ण केली जावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.विविध सिंचन प्रकल्पातील कामांच्या आढाव्याबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. याप्रसंगी बैठकीस माजी मंत्री अब्दुल सत्तार, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यासह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या योजनेची अंदाजित किंमत ₹534.92 कोटी इतकी असून 4.79 दलघमी पाणीसाठा व 1422 हेक्टर सिंचन क्षमता प्रस्तावित आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमध्ये अजिंठा बंधारा (ता. सिल्लोड), खेळणा मध्यम प्रकल्प (उंचीवाढ प्रस्ताव) तसेच पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे या योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आलाअजिंठा बंधारा (ता. सिल्लोड) या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत सुमारे ₹250 कोटी इतकी असून प्रकल्पीय पाणीसाठा 7.00 द.ल.घ.मी. आहे. सर्वसाधारण आराखड्यास संकल्पनात्मक मूल्यांकनानंतर मान्यता देण्यात आली असून सर्व्हेनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

खेळणा मध्यम प्रकल्प (ता. सिल्लोड) प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा 12.60 दलघमी असून सिंचन क्षमता 2429 हेक्टर आहे. गाळ साचल्यामुळे घटलेला पाणीसाठा पूर्ववत करण्याच्या अनुषंगाने उंचीवाढ करणे कामास तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली.

०००

संबंधित पोस्ट

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतल्या मॅरेथॉन बैठकाजिल्ह्यातील एकही सुशिक्षीत तरुण बेरोजगार राहणार नाही  – मंत्री मंगलप्रभात लोढा* रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री यांची मंजुरी

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

महाबळेश्वर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर…

सांगली पॅटर्न – सांगली जिल्ह्यातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम !!बालगृहातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचेशनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शन- जिल्हाधिकारी अशोक काकडे- कौशल्य विकासाद्वारे स्वयंरोजगारातून तिमिरातुनी तेजाकडे” 

vishwatmaklokswamivarta

माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांना गती द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta