vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट

मेळघाटातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध;जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट

अमरावती, प्रतिनिधी : मेळघाटातील आरोग्य सुविधा अधिक बळकट आणि सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला.

 नुकतेच जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी धारणी तालुक्यातील सलोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र नाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव कंकाळ, डॉ. शिरसाठ उपस्थित होते.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी संपूर्ण आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेची तपासणी केली. त्यांनी औषध भांडारातील साठ्याची आणि औषधांच्या मुदतीची जातीने खात्री करून घेतली. प्रसूती गृहातील सर्व वैद्यकीय उपकरणे सुस्थितीत आणि कार्यान्वित असल्याचे पाहिले. तसेच, वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी प्रत्यक्ष जनरेटर चालू करून त्याची पडताळणी केली. कनिष्ठ सहाय्यक कार्यालयातील कागदपत्रांचे विविध रंगांच्या फाईल्समध्ये केलेले योग्य वर्गीकरण पाहून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले.

आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. निवासस्थानांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी तातडीने अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देत त्यांनी ही दुरुस्ती लवकरच करून दिली जाईल, असे आश्वासन दिले. त्यांनी १०२ रुग्णवाहिका चालकांना सूचना दिल्या की, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे हे प्राथमिक कर्तव्य असून रुग्णांकडून पैशांची कोणतीही मागणी केल्यास कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच कुपोषित बालकांवर स्थानिक स्तरावर उपचार व्हावेत, यासाठी बालउपचार केंद्रात आवश्यक बेडची व्यवस्था करून हे केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

*****

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका 23 शाळांचा निकाल 92.19% – महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे लक्षणीय यश…नमुंमपा सानपाडा शाळेचा विद्यार्थी अभिराम राऊत 94.40% गुण संपादन करीत महापालिका शाळांमध्ये सर्वप्रथम..

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती जालनाच्या वतीने खालील मागण्या बाबत माननीय श्री चंद्रमोहन चिंतन साहेब उपदेशक परिवहन अधिकारी जालना यांना निवेदन सादर

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये अधिक प्रभावी काम करुन नवी मुंबईचे मानांकन उंचवावे – अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार*

vishwatmaklokswamivarta

केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणांची उपलब्धता; गरीब रुग्णांना शस्त्रक्रियेत दिलासा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक आरोग्य सेवेला बळ; शस्त्रक्रियांची अचूकता आणि सुरक्षितता वाढणार

दिव्यांग, तृतीयपंथीयांसह वंचित घटकांतील मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहीम