vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सीडीएस परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण उमेदवारांना 11 जूनला मुलाखतीसाठी हजर राहाण्याचे आवाहन

सीडीएस परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण उमेदवारांना 11 जूनला मुलाखतीसाठी हजर राहाण्याचे आवाहन

 सांगली, प्रतिनिधी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 15 जून 2026 ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत सी.डी.एस. कोर्स क्र. 67 आयोजित करण्यात येत आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 11 जून 2026 रोजी मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. मुलाखतीस येते वेळी उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील सी.डी.एस. -67 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत – (१) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (२) उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. (CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईनव्दारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्र. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी 5 एप्रिल अर्जाची मुदत…

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पशुपालकांपर्यंत पोहचवावी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

जर्मनीत बर्लिन इथं भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत–जर्मनी संबंधांवर महत्त्वपूर्ण भाषण केलं. 🇮🇳🤝🇩🇪

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये धैर्य, शारीरिक क्षमता निर्माण करावी- राज्यपाल हरिभाऊ बागडे* ▪️शिरूर अनंतपाळ येथे प्रभाकर कुलकर्णी गुरुजी यांचा जीवनगौरव सोहळा  ▪️’असा एक प्रभाकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

महाराष्ट्रातील एकही शाळा बंद होणार नाही – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर