vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम;राज्यातील ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

 

बुलढाणा, प्रतिनिधी: भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

बीएलओच्या प्रत्यक्ष घरांना भेटी : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.

जनगणनेच्या कामाशी सांगड : सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.

महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रक: दिनांक २० ते २९ जून २०२६ या कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.

राजकीय पक्षांना आवाहन : भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

000000

संबंधित पोस्ट

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मेगा पदयात्रेचे आयोजन**नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा* *जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

सॉल्वेंट व धोकादायक केमिकल वापरासाठी परवानगी न घेतलेल्या उद्योगावर फौजदारी गुन्हा दाखल करा    – जिल्हाधिकारी अशोक काकडे

यूपीएससी मुख्य परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता मॉक इंटरव्हिव्यूचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीप्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

ई-महसूल प्रणालीचे क्यूआर कोड वापरुन ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा !जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपलख वापर- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य सरकारचा ‘मार्वल’ कंपनी समवेत सामंजस्य करार