vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

जड-अवजड वाहनांकरिता वाहतूक बंदी अधिसूचना जारी

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडील पत्राचे अवलोकन करता, स्थानिक नागरीक व पर्यटक यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीकोनातून व अपघात टाळण्याचे दृष्टीकोनातून तसेच कालेखिंड ते कनकेश्वर फाटा (चॅम्पीयन चौक) या मार्गाचे काम सुरळीत आणि दिलेल्या कालावधीमध्ये (पावसाळयापुर्वी) पुर्ण करण्याच्या उद्देशाने या आदेशाचे दिनांकापासून ते दि.31 मे 2026 रोजीपर्यत या मार्गावरील जड अवजड वाहनांना वाहतुकबंदी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

 कार्लेखिंड ते कनकेश्वर फाटा (चॅम्पीयन चौक) या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक ही या आदेशाचे दिनांकापासून ते दि.31 मे 2026 पर्यंत पूर्णपणे बंद करुन या कालावधीमध्ये पर्यायी मार्ग म्हणून कार्लेखिंड-पिंपळभाट-अलिबग रिलायन्स बायपास चौक-बायपास रोड ते अलिबाग रेवसनाका-बुरूमखान-मानी फाटा मार्गे आरसीएफ कंपनी थळ-ते कनकेश्वर फाटा-चोंढी मांडवा अशी व मांडवा मार्गे येणारी वाहतूक ही मांडवा चोंढी मार्गे आरसीएफ कंपनी थळ-मानी फाटा मार्गे अलिबाग रेवस नाका-बायपास रोड-रिलायन्स चौक-पिंपळभाट मार्गे कार्लेखिंड मार्गे पोयनाड अशी जड-अवजड वाहनांची वाहतूक करण्याचे आदेश जारी केले आहेत.

ही वाहतूक बंदी अधिसूचना दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला, पाणी इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, यांना लागू राहणार नाही.

 

०००००००

संबंधित पोस्ट

इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातूनक्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगांव राजा तालुक्यातील अंढेरा गावांसाठी तीन टँकर मंजूर..

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार* *मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!*   *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकरीस्तरीय ई-पीक पाहणीस २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

अमरावती महानगरपालिकेला ई-बस डेपो व चार्जिंग सुविधेसाठी बडनेरा येथे जमीन