vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध

बुलढाणा, प्रतिनिधी: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्यातील किमान दहा वर्षे वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाने बीजभांडवल योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, चहा-स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स-लॅमिनेशन सेंटर, फ्रुट स्टॉल, पिठाची गिरणी, कापडी पिशव्या तयार करणे, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मालवाहतूक टेम्पो, आईसक्रिम फॅक्टरी, वडा-पाव व ज्युस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, बटाटा वेफर्स निर्मिती, ब्युटी पार्लर, सलून, चिकन-मासे विक्री केंद्र, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे तसेच लाँड्री व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षित तृतीयपंथीय व्यक्तींना प्लंबर, फ्रिज दुरुस्ती, इलेक्ट्रिशियन, टीव्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, स्मार्ट खेळणी तयार करणे, ए.सी. दुरुस्ती, गॅस शेगडी दुरुस्ती, घरगुती उपकरणे दुरुस्ती, वॉटर हिटर, गिझर व वॉटर फिल्टर दुरुस्ती यांसाठी आवश्यक साधनसंच खरेदीकरिता देखील कर्ज उपलब्ध होणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक तृतीयपंथीय व्यक्तींनी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, बुलढाणा येथे अर्ज प्राप्त करून तो दि. ३० मे २०२६ पर्यंत सादर करावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

vishwatmaklokswamivarta

पूरग्रस्त भागातील तरुणांसाठी नाविन्यपूर्ण ड्रोन पायलट प्रशिक्षण 

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी मोफत पोलीस – सैन्यदल भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत

बिहारच्या नव्याने शपथ घेतलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात