vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

बुलढाणा, प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी “कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना” राबविण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांक जमीन-२०१५/प्र.क्र.६४/अजाक, दिनांक १४ ऑगस्ट २०१८ अन्वये ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ४ एकर कोरडवाहू (जिरायती) जमीन कमाल प्रतिएकर ५ लाख रुपये किंमतीपर्यंत किंवा २ एकर ओलीताखालील (बागायती) जमीन कमाल प्रतिएकर ८ लाख रुपये किंमतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक असून तो दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन असावा. लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ६० वर्षे असावे. लाभार्थी निवडीत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन परित्यक्ता महिला, विधवा महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्याचारग्रस्तांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शासन निर्णय दिनांक १४ मार्च २०१८ नुसार जिल्हास्तरीय समितीमार्फत जमीन खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रचलित रेडीरेकनर दरानुसार जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून आवश्यकतेनुसार रेडीरेकनर दरापेक्षा अधिक किंमत देण्याची तरतूदही शासनाने केली आहे. मात्र, जिरायती जमिनीसाठी प्रतिएकर ५ लाख रुपये व बागायती जमिनीसाठी प्रतिएकर ८ लाख रुपये ही कमाल मर्यादा राहणार आहे.

शासन मान्य दरानुसार जमीन शासनास विक्री करण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बुलढाणा यांच्या कार्यालयात दि. १२ जून २०२६ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताबद्दल एनएचएआयकडून दुःख व्यक्त

अक्षय तृतीयेस गोमय उत्पादने वस्तु विक्री दिवस

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या आझाद मैदानावर जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष शाहूराज माने योच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न

विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण मोहिमेत पात्र मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- 30 जून ते 29 जुलैदरम्यान बीएलओकडून घरभेटी

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर बुरखा घालून येणाऱ्या महिला मतदारांची ओळख सन्मानपूर्वक आणि गोपनीयतेने पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था

vishwatmaklokswamivarta