vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

      अमरावती, प्रतिनिधी : अखिल भारतीय औषधी विजेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषधविक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहे.

 बंदच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडीत व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केली आहे. सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्र औषध दुकाने, तसेच 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकानांनी समन्वय साधण्यात येत आहे. यात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

    नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले ओ. अन व औषध प्रशासन, अमरावती कार्यालया हेल्पलाईन क्रमांक – गजानन घीरके, सहायक आयुक्त (औषधे) वाशिम, अमरावती-९८५०१५०६८७, मनिष गोतमारे, औषध निरीक्षक, वाशिम, अमरावती ९५५२५७४४९५, तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पन्नाईन क्रमांक – अमरावती शहर – प्रविण देशमुख 9422158409, संजय बोबडे 9422157615, सौरभ मालानी 9423812345, मनोज डफळे 9823205250, राजा नानवाणी 9822643226 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) करण्यात मि. कृ. काळेश्वरकर यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

विकसित भारत जी राम जी अंतर्गत जिल्ह्यात एकूण 28,368 कामांना मान्यता- दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत नियोजन- 25,75,401 मजूर-दिवस रोजगार उपलब्ध होणार- जलतारा, जलपुनर्भरण, सिंचन सुविधा, चारा लागवडीच्या कामांवर भर- दुष्काळ जाहीर झालेल्या चार तालुक्यांत 13,422 कामे

समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदैव तत्पर–प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत

vishwatmaklokswamivarta

एमपीएससीकडून ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द

एटापल्लीचा मशरूम प्रकल्प जोमात; उत्पादनाला बाजारपेठेत उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद*“स्थानिक मशरूम खरेदी करून उपक्रमाला साथ द्या” – महिला बचत गटांचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप