vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी

पाली प्रतिनिधी : औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन सुधागड तालुका मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी सांगितले. कंपन्यांमधून उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधींची मोठी संख्या लक्षात घेता तुलनेने युवा पिढीकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतो ही बाब मोठी खेदजनक असून युवा वर्गाने आणि पालकांनीही यामागील गांभीर्य वेळेत लक्षात घ्यायला हवे तसेच रोजगार संधीं मिळवण्यासाठी युवा पिढीला प्रोत्साहन द्यायला हवे,असेही साजेकर यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रात सर्वाधिक रोजगार संधी उपलब्ध असून सुद्धा युवा पिढी मात्र कब्बडी, क्रिकेट व सोशल मीडियाच्या अति आहारी गेल्यामुळे ज्या वयात करिअर घडवण्याचे वय आहे त्या वयात निष्कारण वेळ वाया घालवीत असल्याचे चित्र बदलायला हवे हा उद्देश डोळ्यामोर ठेवून आपल्या तालुक्यातील भार्जे गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर गोफण यांच्या सहकार्याने सदर रोजगार मेळावा आयोजित करण्याचा विचार पक्का केला असे साजेकर यांनी सांगितले.

 

सुधागड तालुक्यातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या सुधागड तालुका मराठा समाज संस्थेने बेरोजगार युवक-युवतींना एकाच व्यासपीठावर थेट रोजगाराच्या संधी मिळाव्यात या हेतूने सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तर या प्रसंगी रामदास साजेकर यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत सादर केले .

 

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका मराठा समाज संस्था व यशस्वी स्किल्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पाली येथे आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे १२० उमेदवारांनी नावनोंदणी केली होती.

 

सुधागड पाली येथील स्वर्गीय सटुराम सखाराम साजेकर सभागृहात आयोजित या रोजगार मेळाव्यात यशस्वी स्किल्स लिमिटेडच्यावतीने खोपोली,पनवेल,मुंबई,ठाणे,कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील शिका आणि कमवा योजना तसेच अप्रेंटिस योजनेतील प्रशिक्षणार्थी पदांसाठीच्या पाच हजारहून अधिक रोजगार संधींसाठी मुलाखती घेण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यात ५१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

 

किमान दहावी पास, बारावी पास, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर,इंजिनिअरिंग अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या किमान वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या युवक-युवतींसाठी या रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे यावेळी यशस्वी संस्थेचे जनसंपर्क प्रमुख योगेश रांगणेकर यांनी सांगितले.तसेच यशस्वी संस्थेच्या शिका आणि कमवा योजना व अप्रेन्टिस योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना नामांकित औद्योगिक कंपन्यांमधून ऑन द जॉब ट्रेनिंगद्वारे रोजगारक्षम होण्याची संधी मोफत दिली जाते. दरमहा ठराविक रक्कम विद्यावेतन (साधारणतः रुपये १५ हजार ते २२,०००) दिले जाते, तसेच शिका आणि कमवा योजनेतील विद्यार्थ्यांना शासनमान्य डिप्लोमाचे शिक्षण देण्यात येते. तर अप्रेन्टिस योजनेच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, दरमहा विद्यावेतन व वर्षभराचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अप्रेंटिसचे प्रमाणपत्र प्रदान केले जाते, विशेष’ बाब म्हणजे या रोजगार संधींसाठी कोण्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही असेही त्यांनी सांगितले.

रोजगार समिती प्रमुख अमित दंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष निंबाळकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन संचालक केतन म्हसके यांनी केले.

या रोजगार मेळाव्यासाठी संस्थेचे सरचिटणीस सुजित बारसकर, खजिनदार योगेश मोरे,संचालक अशोक शिंदे, एड. नितीन शेवाळे,प्रदीप गोळे व पंढरीनाथ म्हसके तसेच सुधागड तालुका मराठा समाज संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आदींनी विशेष सहकार्य केले.0000

संबंधित पोस्ट

जालना शहर महानगरपालिका विषय समित्यांचे भाजपा उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल

आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी नागरिकांना कालमर्यादेत सेवा द्यावी  – उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल

vishwatmaklokswamivarta

सुरक्षित इंटरनेट वापराबाबत कार्यशाळा संपन्नपैसे मागणाऱ्या अज्ञात नंबरवरील कॉल्सला उत्तर देऊ नका – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

मतदान यंत्राच्या प्रथम स्तर तपासणी कार्यवाहीची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेकडून पाहणी 

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta