vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

राज्य प्रतिनिधी“बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. भारतीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली यांनी निश्चित केलेल्या नियम व पात्रता निकषांनुसारच संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती केली जात असून, जागा रिक्त राहू नये यासाठी शासन सर्व आवश्यक उपाययोजना करत असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्रालयात बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेत बदल करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई तसेच संबंधित अधिकारी आणि संस्था चालक, प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

vishwatmaklokswamivarta

त्याग आणि शिस्त हाच खऱ्या देशभक्तीचा पाया : सर्वानंद सोनोवाल

पासपोर्ट संबंधित समस्या निराकरणासाठी 10 डिसेंबरला संवादसत्र

vishwatmaklokswamivarta

शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा; केंद्रीय मंत्री श्री. गजेंद्र सिंह शेखावत यांची प्रमुख उपस्थिती*

कट प्रॅक्टिस खपवून घेतली जाणार नाही; शासकीय रुग्णालयांवर विश्वास वाढवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर.

🇮🇳 ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर तिरंगा यात्रेचे आयोजन!