vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

जालना, प्रतिनिधी : जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरगणना (House Listing Operation) कार्यक्रमात जालना जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत जालना जिल्ह्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक प्रगती साधली आहे.

राज्यस्तरीय आढाव्यानुसार, जालना जिल्ह्यातील एकूण 2863 HLB पैकी 2708 HLB चे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्याने तब्बल 94.59 टक्के प्रगती साधली आहे. ही प्रगती राज्यातील सर्वाधिक असून, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीची आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयाची ही मोठी पावती मानली जात आहे.

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा जनगणना कक्ष, पर्यवेक्षक, प्रगणक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे घरगणना मोहिमेला वेग मिळाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले असून, उर्वरित कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, जनगणना-2027 ही देशाच्या नियोजन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची मोहीम असल्याने नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेची थकीत मालमत्ताकर वसुलीसाठी ढोलताशे मोहीम**मालमत्ताकर थकबाकीदार नवी मुंबई महानगरपालिकेच्या रडारवर*  *३१ मार्च २०२५ पूर्वी कर भरण्याचे मालमत्ताकर थकबाकीदारांना आवाहन* 

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

vishwatmaklokswamivarta

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी चालना मिळेल- पणनमंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

शालेय जीवनात उद्यमशीलतेला चालना देण्यासाठी‘सक्षम’ कार्यक्रम ठरला प्रभावी…

vishwatmaklokswamivarta