vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

     अमरावती, प्रतिनिधी : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.   जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. खारगे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आदी अधिकारी उपस्थित होते.

    श्री. खारगे यांनी महसूलमधील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस दौरा करावा. यामुळे प्रशासनावर पकड मजबूत करण्यास मदत होणार आहे. दौरा करताना विविध विकासकामांची तपासणी केल्यास तथ्य जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच जनतेशी भेटावे. त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. निवेदनावर केलेली कारवाई कळवावी. यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात येतात. हे सर्व करीत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्याही जाणून घ्याव्यात. प्रशासनाने नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. त्यांच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार 12 दुरूस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रामुख्याने जिल्ह्यात लोकसहभागातून निर्माण करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याची माहिती दिली. तसेच रहिवासी जमिन नियमानुकूल करणे, पट्टेवाटप करणे, मिळकत पत्रिका वाटप करणे याबाबत माहिती दिली

      दरम्यान श्री. खारगे यांनी सकाळी अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती तहसील कार्यालय, सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वडाळी मंडळ अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.

000000

संबंधित पोस्ट

येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

विकसित भारत – रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण (VB-GRAMG) अभियानाचा भिवंडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभग्रामीण कुटुंबांना १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी; आत्मनिर्भर आणि समृद्ध गावांच्या निर्मितीकडे महत्त्वपूर्ण पाऊल

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तर भाग घेणाऱ्या स्पर्धकांनाही मिळणार प्रशस्तीपत्र 

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण’ मोहिमेत सर्व पालकांनी सहभागी व्हावे रविवार २८ जून रोजी ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजा; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन