vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावीशाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावीशाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

अमरावती, प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांच्या खात्यात अद्याप पुरस्काराची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलबद्दल ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ अर्जात चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड नमूद केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे.

याबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. परंतू महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे अचूक बँक तपशील समाज कल्याण कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम त्वरित जमा व्हावी, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दुरुस्त करून 31 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून ते जमा करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र -जनगणना २०२७: घरयादी व घरगणनेचा पहिला टप्पा! 🇮🇳 एक मे 20 26 पासून जनगणनेची प्रक्रिया सुरू

करदात्यांना सुलभता प्राप्त व्हावी विभागाकडून विविध सुविधा : सहआयुक्त सौ. रंजना देशमुख 9 वा वस्तू व सेवा कर (जीएसटी) दिन 1 जुलै 2026 

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

vishwatmaklokswamivarta

देवाभाऊ मराठवाडा महाराष्ट्रात आहे का?” डॉ. संजय लाखेपाटील

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती;पहिल्या टप्प्यात ५ हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट- मंत्री आदिती तटकरे.