vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

*सातारा जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर*

सातारा प्रतिनिधी : मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या १३९ तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ८७४ अशा एकूण १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडणार आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणेविशेष ग्रामसभेची सूचना देणे – ८ जून २०२६विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे – १२ जून २०२६ प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे – १९ जून २०२६ हरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधी – १९ जून ते २५ जून २०२६ हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ३ जुलै २०२६अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ८ जुलै २०२६अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे – १० जुलै २०२६तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्यासातारा तालुक्यात सर्वाधिक १४५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया होणार असून कराडमध्ये १३३, पाटणमध्ये १२०, खटावमध्ये ११० आणि फलटणमध्ये १०२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तसेच कोरेगाव ७८, वाई ७६, खंडाळा ६१, माण ६१, जावली ७९ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठीही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आरक्षण प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे.

०००००

संबंधित पोस्ट

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

रत्नागिरी  मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता, मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांच्या मनात कायम अजरामर राहील!

vishwatmaklokswamivarta

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी