vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छ.ग.) पोलीसांकडून नष्ट

राज्य प्रतिनिधी* आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या आंतरराज्यीय अभियानादरम्यान विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.* “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत पुन्हा एकदा माओवादी शस्त्रसाठा जप्त; ज्यामध्ये 01 नग इन्सास रायफल, 02 नग सिंगल शॉट रायफल, 02 नग 12 बोअर रायफल व एकूण 18 जिवंत काडतुसे यांचा समावेश.

गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ समाप्त झाली आहे. सुरक्षा दलांना धोका पोहोचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे. आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हे साहित्य तयार करून गोपनीयरीत्या जंगल परिसरात जमिनीत लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणुका इत्यादी प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करण्यासाठी केला जात होता.

दिनांक 23 मे 2026 रोजी करण्यात आलेल्या कारवाईनंतर दिनांक 27 मे 2026 रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे

00000

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील सेक्टर 44 ए नेरूळ येथे अनधिकृत लॉजींग अँड बोर्डींगवर धडक सीलबंद कारवाई*

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

इंडियाज गॉट लेटेंट नावाचा शो-करमणुकीच्या नावाखाली अश्लिलता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना, यांच्यावर गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

मुंबईत दादर येथील टोरेस ज्वेलरी कार्यालयाबाहेर गोंधळ सुरूच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

ठाण्यात कोडीनयुक्त कफ सिरपच्या (ड्रग्ज) 17,640 बाटल्या जप्त; पाच जणांना अटक.

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; हरियाणा सोनीपत येथील कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण…

vishwatmaklokswamivarta