vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

जोखीमग्रस्त तालखेड गावात २१३ नागरिकांची मोफत एक्स-रे तपासणी

बुलढाणा,द प्रतिनिधी : “माझे गाव, आरोग्य संपन्न गाव” तसेच टीबी मुक्त भारत अभियानाच्या १०० दिवसीय उपक्रमांतर्गत आणि कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरी गवळी यांच्या वतीने जोखीमग्रस्त तालखेड गावात क्षयरोग निदानासाठी मोफत एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरामध्ये नागरिकांना क्षयरोगाची लक्षणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचारपद्धती तसेच नियमित तपासणीचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना टीबी निर्मूलनाची शपथही देण्यात आली

या आरोग्य शिबिरादरम्यान जोखीमग्रस्त (Vulnerable Population) गटातील एकूण २१३ लाभार्थ्यांची मोफत एक्स-रे तपासणी करण्यात आली. त्यामुळे संभाव्य क्षयरुग्णांचे लवकर निदान होण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

शिबिराला तालखेडचे सरपंच मारोती कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य मोहन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. आरोग्य विभागाकडून डॉ. अनिकेत चिंचोले (वैद्यकीय अधिकारी), डॉ. योगेश सरदार (समुदाय आरोग्य अधिकारी), अमोल देशमुख (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक), सुभाष राजपूत (एक्स-रे टेक्निशियन), व्यवहारे (आरोग्य निरीक्षक), घडेकर (आरोग्यसेवक), प्रियंका इंगळे (आरोग्यसेविका), अंजना झगरे (आरोग्यसेविका) तसेच तालखेड येथील आशा स्वयंसेविकांनी सहभाग नोंदविला.

टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत हिवताप – डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे प्रभावी नियोजन

रुग्णांना दर्जेदार सेवा द्या – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग 

क्षय आरोग्य धाम येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा; तज्ज्ञांव्दारे क्षयरुग्णांना मार्गदर्शन