vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरु

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणे या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतीगृह, वाशी नवी मुंबई (व्ही. बिल्डिंग पहिला मजला, प्लॉट नंबर 7, सेक्टर 19 वी, वाशी नवी मुंबई) येथे सुरु झाले आहे.

सन 2026-27 पासून पुढे वसतिगृहासाठी विहित मुदतीत अर्ज करणाऱ्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देय राहील. तसेच, ज्या पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षास प्रवेश देय आहे त्याच पदवी अभ्यासक्रमास द्वितीय वर्षाकरिता प्रवेश देय राहील. तद्नंतर या योजनेंतर्गत जागा रिक्त राहिल्यास पात्र विद्याथ्यांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश देय राहील. तथापि, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेताना 12 वी परीक्षेच्या अंतिम निकालाचे गुण विचारात घेण्यात येतील.

सन 2026-27 साठी अभ्यासक्रमनिहाय व जात प्रवर्गनिहाय रिक्त जागा दर्शविणारे विवरणपत्र पुढीलप्रमाणे आहे:-प्रवर्ग- इतर मागास वर्ग, एकूण आरक्षण 51 टक्के, प्रवर्ग- विमुक्त जाती व भटक्या जमाती, एकूण आरक्षण 33 टक्के, प्रवर्ग- विशेष मागास प्रवर्ग, एकूण आरक्षण 6 टक्के, प्रवर्ग- दिव्यांग , एकूण आरक्षण 4 टक्के, प्रवर्ग- अनाथ, एकूण आरक्षण 2 टक्के, प्रवर्ग- आर्थिक मागास प्रवर्ग (EWS), एकूण आरक्षण 4 टक्के.

शासन निर्णयातील सविस्तरअटी व शर्ती तसेच वसतिगृहाची अधिक माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, रायगड, कच्छिभवन, नमिनाथ जैन मंदिरा जवळ, श्रीबाग रोड, अलिबाग, जि.रायगड येथे उपलब्ध होईल.

000000

संबंधित पोस्ट

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न..

जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश* *शिवतीर्थावर शिवभक्त शिवप्रेमींचा जल्लोष*

vishwatmaklokswamivarta

राजमाता महोत्सव 2026 ची उत्साहात सांगता; पाच दिवसांत 40 लाखांहून अधिक विक्री

मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे निर्देशप्रशासनाला फिल्डवर जाऊन कार्यवाही करण्याचे आदेश – ना.मकरंद जाधव-पाटील

मुंबई महानगरपालिकेच्या’ एफ’ नॉर्थ कार्यालयासमोरील रस्ता प्रवाशांसाठी ठरतोय जीवघेणा..?