vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले

मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण व जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, सोलर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे सर्वेक्षण करून कोणत्या झोनमध्ये किती जमीन येते, याची माहिती संकलित करावी. तसेच भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना रेडी रेकनरनुसार मोबदला मिळाला आहे का, याची पडताळणी करून याचाही अहवाल शासनाकडे सादर करावा. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत तीन स्वयंसेवी संस्थांमार्फत (एनजीओ) स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. या संस्था जळगाव जिल्ह्याबाहेरील असाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यांना तातडीने प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित सोलर ऊर्जा कंपनीच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी. याबरोबरच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र तसेच अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

 

००००

संबंधित पोस्ट

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडविणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*