vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नि:पक्ष, भयमुक्त निवडणुकीसाठी आवश्यक उपाययोजना करा- निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

नि:पक्ष, भयमुक्त निवडणुकीसाठी आवश्यक उपाययोजना करा- निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

 

लातूर, प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक तहसीलदार कार्यालयामध्ये यासाठी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली असून या मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच ही निवडणूक नि:पक्ष आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांच्या प्रशिक्षणाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, लातूर शहर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश पवार यावेळी उपस्थित होते.

मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम योग्य प्रकारे पार पाडावे. मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करावी. या प्रक्रियेत कोणतीही उणीव राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. मतदान केंद्र तहसील कार्यालयात असल्याने मतदारांच्या सोयीसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था उपलब्ध असावी. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, असेही निवडणूक निरीक्षक श्री. बोरकर यांनी सांगितमतदान केंद्रावर नियुक्त सर्व केंद्राध्यक्ष, कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. सर्वांनी समन्वयाने काम करून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यावेळी म्हणाले.प्रारंभी देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी उपस्थितांना निवडणूक विषयक प्रशिक्षणाची माहिती दिली.लातूर, औसा येथील मतदान केंद्रांना भेट; सुरक्षा कक्षाची पाहण उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी लातूर तहसीलदार कार्यालय आणि औसा तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रांना भेट देवून तेथील सुविधांची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात तयार करण्यात आलेल्या मतपेटी सुरक्षा कक्षाला भेट देवून 0तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला.

 

*****

संबंधित पोस्ट

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत6, 7 डिसेंबरला ग्लोबल युथ फेस्टिव्हल 2025

vishwatmaklokswamivarta

सैलानी उत्सवासाठी वाहतुकीत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे मार्ग वळविण्याचे आदेश…

पुढील सात दिवस महाराष्ट्रात  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज

मुस्लिम औरंगजेबाची नव्हे, आपलीच अवलाद – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* मीरा रोडमधील बकरी ईद वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे वक्तव्य*

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ: मतदार नोंदणीसाठी ‘फॉर्म 19’सादर करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंत

vishwatmaklokswamivarta