vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

औषध विक्रेत्यांनी नियमाचे पालन करुन औषध विक्री करावी -अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमान्वये मे. तोष्णीवाल मेडिकल्सवर कारवाई

नांदेड प्रतिनिधी आज नांदेड शहरातील मे. तोष्णीवाल मेडिकल्स, डॉक्टर्स लेन, नांदेड या पेढीकडून मुदतबाहय औषधाची डॉक्टराच्या चिठठीशिवाय, फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये, विना बिलांने विक्री झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सदरील पेढीविरूध्द औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठठीशिवाय फार्मासिस्टचे गैरहजेरीमध्ये विना बिलाने औषधाची विक्री करू नये. डॉक्टराच्या चिठठीवरील औषधी विक्री करतेवेळी विक्री करण्यात येत असलेल्या औषधाचा तपशील व औषधावर नमूद तपशील यामध्ये तफावत आढळून येणार नाही याची त्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी. मुदतबाहय औषधांचे सेवनामुळे रूग्णांचे आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी मुदतबाहय औषधी विक्री होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सर्व औषधी विक्रेत्यांना करण्यात आले आहे.

सर्व औषध विक्रेत्यांनी सतर्क राहून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 चे पालन करूनच औषधांची विक्री करावी. कायद्याचे उल्लघंन झाल्यास किंवा त्यांचेविरूध्द या प्रशासनास तक्रारी प्राप्त झाल्यास व सत्यता पडताळणीमध्ये दोषी आढळून आल्यास त्यांचेविरूध्द कडक कारवाई घेण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी.

नागरिकांनी अशा प्रकारची औषधी विक्री होत असल्याचे आढळून आल्यास, त्यांनी तात्काळ प्रशासनाकडे संपर्क साधावा जेणेकरून संबंधित पेढयाविरूध्द कारवाई करता येईल, असे सहाय्यक आयुक्त औषधे अ.तु.राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2026.

vishwatmaklokswamivarta

जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून सायक्लोथॉन; अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- सांगलीत कृष्णाकाठी आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम संपन्न

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)-निस्पृह सेवाव्रती काळाच्या पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी खासदार डॉ गोपाळराव पाटील यांना श्रद्धांजली*

vishwatmaklokswamivarta