vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

बुलढाणा,दि प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी दोन दिवसीय ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह फॉर ई-श्रम टास्क’ आयोजित करण्यात आला आहे. हा ऑनलाईन रोजगार मेळावा २० आणि २१ जून २०२६ रोजी होणार असून, १० वी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये असफा ग्लोबल फायनान्स (बुलढाणा), क्रेडिट ग्रामीण लिमिटेड (बुलढाणा) आणि वैभव इंटरप्रायसेस (नागपूर) या कंपन्या सहभागी होत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना बुलढाणा तसेच नागपूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

हा उपक्रम केंद्र सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिस (NCS) पोर्टलशी संलग्न असून, गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांची माहिती थेट एनसीएस पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना भविष्यात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध सरकारी व खासगी नोकऱ्यांच्या संधींबाबत मोफत माहिती आणि अपडेट्स मिळत राहतील. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत गुगल फॉर्मद्वारे निःशुल्क नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांशी मुलाखतीसाठी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जाणार आहे.

अधिक माहिती व पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनेलला जोडावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग उभारणीची सुवर्णसंधी

जिजाऊ संस्थेकडून पिवळी केंद्रातील ९ शाळांमधील १,०५० विद्यार्थ्यांना ३,१०० मोफत वह्यांचे वितरण

एलपीजीचा अवैध साठा, काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे ११ ऑगस्टला अतिरिक्त प्रवेश फेरी

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*