vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

    नवी मुंबई प्रतिनिधी –   नवी मुंबई महानगरपालिका व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सिडको प्रदर्शनी केंद्र, वाशी येथे सकाळी 6.30 वा. करण्यात आले आहे.

या विशेष योग कार्यक्रमात नागरिक, विविध शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक, महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे तसेच निरोगी जीवन शैलीचा संदेश समाजात रुजावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे क्रीडा समिती सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांनी सांगितले आहे.

          आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग चळवळीला बळ द्यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.

          तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

रेखा भगवान शेजुळ यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन