vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी) : प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्ह्यात खामगाव येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. या नवीन कार्यालयाचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या संदर्भात नागरिकांकडून १५ दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी जाहीर सूचनेद्वारे दिली आह

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.प्रस्तावित रचनेनुसार जिल्ह्याची विभागणी करताना अपर जिल्हाधिकारी कार्यालय, खामगाव या नवीन मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात खामगाव, शेगाव, मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद अशा एकूण ७ तालुक्यांचा समावेश असेल. या नवीन कार्यालयाच्या निर्मितीनंतर मूळ अपर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्याकडे बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मेहकर आणि लोणार हे एकूण ६ तालुके राहतील. या नवीन प्रशासकीय रचनेमुळे जिल्ह्यातील एकूण १३ तालुक्यांचे विकेंद्रीकरण अधिक प्रभावीपणे होणार आहे.या प्रस्तावित अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मिती किंवा कार्यक्षेत्र निश्चितीबाबत जिल्ह्यातील संबंधित नागरिक, संस्था आणि इतर घटकांना काही आक्षेप, हरकती किंवा सूचना मांडायच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सादर कराव्यात. या सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत म्हणजेच दिनांक ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

संबंधित पोस्ट

रि-केवायसी करून खाते अद्यावत करा जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नितीन तळपे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

vishwatmaklokswamivarta

शाळा प्रवेशोत्सवात नवप्रवेशितांचे जल्लोषात स्वागत; जिल्हाभर अधिकाऱ्यांच्या शाळांना भेटी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी जि.प.हायस्कूल विष्णुपूरी येथे भेट देऊन केले विद्यार्थ्याचे स्वागत

जवाहर नवोदय विद्यालय पात्रता परीक्षा-केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश

vishwatmaklokswamivarta

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे