vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यासाठी 5 दिवस येलो अलर्ट जारी 

जिल्ह्यासाठी 5 दिवस येलो अलर्ट जारी

 

नांदेड प्रतिनिधी- जिल्ह्यात 25 जून रोजी तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार स्वरूपाचा व २६ ते २९ जून २०२६ हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी.

आकाशात विजा चमकत असल्यास या गोष्टी करा  ,विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका,आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

0000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

खरीप पेरणीसाठी घाई करू नका ; 80 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा – तालुका कृषी अधिकारी 

मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा; शेतकरी व मच्छिमारांसाठी नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा! – हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

राष्ट्रीय लोक अदालत; ९२६ प्रकरणे तडजोडीने निकाली

vishwatmaklokswamivarta