vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज मागविले३१ जुलै पर्यंत अर्ज सादर करा

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेसाठी अर्ज मागविले३१ जुलै पर्यंत अर्ज सादर करा

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी  : राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार व सन्मान देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत पात्र साहित्यिक व कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ दरम्यान अर्ज सादर करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवड समितीचे सदस्य सचिव दादासाहेब गुंजाळ यांनी केले आहे.

राज्य शासनाने यापूर्वी सुरू असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेत सुधारणा करून नव्या स्वरूपात ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत १५ वर्षांपेक्षा अधिक काळ कला क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे आणि ज्यांची उपजीविका केवळ कलाक्षेत्रावर अवलंबून आहे असे ज्येष्ठ कलाकार तसेच १५ वर्षांपेक्षा अधिक काळ साहित्य क्षेत्रात लेखन, समीक्षा अथवा अन्य साहित्यिक योगदान देणारे साहित्यिक पात्र ठरणार आहेत.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत १० वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षांचे असावे तसेच त्यांचे कार्य सातत्यपूर्ण, दर्जेदार व समाजोपयोगी स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. वयोवृद्ध, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

कलाकार अथवा साहित्यिकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. अर्जदाराची उपजीविका प्रामुख्याने कलाक्षेत्रावर अवलंबून असावी. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत असलेल्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

इच्छुक कलाकार व साहित्यिकांनी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी किंवा आपले सरकार सेवा केंद्राची मदत घेता येणार आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे

0000

संबंधित पोस्ट

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

विठ्ठल दर्शनासाठी खामगावहून ‘हरीभक्तांची’ रेल्वे पंढरपूरकडे रवाना- केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…

जिल्ह्यात हुंडा विरोधी सप्ताहाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

नव्या मुंबईत एसएससी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी परिवहन उपक्रमाकडून विशेष बसगाड्यांची व्यवस्था..