vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सावधान… मंदिर आणि शाळा उघडत असल्याने घ्या काळजी आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

सावधान… मंदिर आणि शाळा उघडत असल्याने घ्या काळजी आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

नाशिक प्रतिनिधी  : जिल्ह्यात तब्बल दीड ते दोन वर्षांनंतर शाळा आणि मंदिरे सुरू होत आहेत. त्यामुळे सण-उत्सव आणि शाळेच्या निमित्ताने पुन्हा एकदा गर्दी होणार असल्याने कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत नागरिकांनी काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

राज्यात सोमवार (ता. ४)पासून शाळा सुरू होत आहेत. त्यापाठोपाठ ७ ऑक्टोबरपासून (घटस्थापना) मंदिरांसह धार्मिक स्थळेही उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे शाळेत आणि मंदिरांसमोर संभाव्य गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. ते म्हणाले, की कोरोनाच्या दोन्ही लाटांचा जिल्ह्यात प्रादुर्भाव राहिला. शहरात दोन लाख ३० हजार, ग्रामीण भागात एक लाख ५५ हजार, तर मालेगावमध्ये १२ हजार ६२५ यांसह जिल्हाभरात चार लाख आठ हजार ४६३ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आठ हजार ६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एवढ्या मोठ्या महामारीत तीन लाख ९८ हजार रुग्ण बरे झाले असले, तरी अजूनही कोरोना संपलेला नाही. केवळ त्याचे प्रमाण कमी झाले आहे. अशाही स्थितीत ९४० च्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या लाटेत तर भयावह अनुभव आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

मुंबईला पाणीपुरवठा करणारे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ ओसंडून वाहण्यास सुरूवात…

राज्याचे चे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एन डी ए ला पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडी कमकुवत होईल; रामदास आठवले यांचा दावा…

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

महिला आयोग आपल्या दारीतून तत्‍पर निर्णयाची खात्री-राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर

vishwatmaklokswamivarta