vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर मंत्री उपस्थित होते

 

नागपूर प्रतिनिधी

701 किमी लांबीचा मुंबई-नागपूर द्रुतगती मार्ग सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. नागपूर आणि शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केवळ आज पार पडलं आहे.

महाराष्ट्रासाठी ड्र्रीम प्रोजेक्ट असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg) चा पहिला टप्पा आज (11 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते खुला करण्यात आला आहे. मुंबई-नागपूर असा हा एक्सप्रेस वे (Mumbai Nagpur Express Way) अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी बनला आहे. त्यामुळेच बहुप्रतिक्षित या महामार्गाकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. हा महामार्ग केवळ महाराष्ट्राच्या आर्थिक आणि उपराजधानीला जोडणारा महामार्ग नव्हे तर महाराष्ट्रातील 10 जिल्ह्ंयातून, 26 तालुक्यांतून आणि 390 गावांमधून जाणार असल्याने खास बनला आहे. म्हणून जाणून घ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ची नेमकी खास वैशिष्ट्यं काय आहेत?

    • महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांबीचा एक्सप्रेस वे आहे. हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. त्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, नाशिक शहरांचा समावेश आहे. एक्सप्रेस वे च्या आजपास असणार्‍या 14 अन्य जिल्ह्यांना देखील यामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान या महामार्गामुळे विदर्भ, मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रच्या 24 अन्य जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे.
    • पर्यटन हे क्षेत्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठी भूमिका बजावत असल्याचं पहायला मिळालं आहे. समृद्धी महामार्ग देखील दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजंठा एलोरा गुंफा, शिर्डी, वेरूळ, लोणार तलाव या राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांजवळून जात आहे. त्यामुळे या पर्यटनस्थळांना देखील चालना मिळणार असल्याचा अंदाज आहे.
    • सध्या समृद्धी महामार्गाचा सध्या एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पण मुंबई-नागपूर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर यावर 120 मीटर लांबीच्या 8 लेन्स असणार आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकीच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर हा प्रवास अवघ्या 8 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. तर पहिल्या टप्प्यात सुरू झालेला नागपूर-शिर्डी हा प्रवास 10 ऐवजी आता अवघ्या 5 तासामध्ये होणार आहे.
    • समृद्धी महामार्ग वर 40-50 किमी च्या अंतरावर इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग व्यवस्था असणार आहे. हायवे वर ट्राफिक मॅनेजमेंट साठी इंटिग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम असणार आहे.
    • समृद्धी महामार्ग हा देशातील हायटेक हायवे देखील आहे. इंटरचेंज जवळ 35-40 हेक्टर जमीनीवर सोलर पॉवर प्रोजेक्ट देखील आहे. यामधून 161 मेगावॉट वीजनिर्मिती देखील होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..अधिष्ठात्याला टॉयलेट साफ करायला लावणे अंगलट

राज्यात नव्याने 10 हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार- कृषी मंत्री धनंजय मुंडे

तळागाळातील लोकांना कायद्याच्या माहितीसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आवश्यक – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रजिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेविषयक जनजागृती मोहीम

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी