
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजपा – शिवसेना बाळासाहेब गट विजयी
जळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष – शिवसेना बाळासाहेबांची गटानं बाजी मारली आहे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचाही पराभव झाला आहे. खडसे यांच्या गटाला केवळ 4 जागा मिळाल्या आहेत.
जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष – शिवसेना बाळासाहेबांची गटानं बाजी मारली आहे. या निवडणुकीत एकूण 20 पैकी 16 जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे एकनाथ खडसे यांना धक्का बसला आहे. आतापर्यंत तेथे खडसेंचं वर्चस्व होतं. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांचाही पराभव झाला आहे.
पहा ट्वीट
प्रतिष्ठेच्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष – शिवसेना बाळासाहेबांची गटानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या दूध संघाच्या या निवडणुकीत एकूण २० पैकी १६ जागांवर भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.



