
राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा संपूर्ण महाराष्ट्रभर श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश विभागाने आयोजित केली
मुंबई प्रतिनिधी : श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड ऑल इंडिया काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे राष्ट्रमाता इंदिराजी गांधी यांना विनम्र अभिवादन करून कल्याण, डोंबिवली,भिवंडी व रायगड जिल्ह्यातील कार्यकारणीची बैठक पार पडली.यावेळी महिला प्रदेश अध्यक्षा रिना खांडेकर सह सर्व महिला पदाधीकारि उपस्थित होत्या.KDMC जिल्हा अध्यक्ष शिबु शेख यांनी या सभेचे आयोजन केले होते.यावेळी माजी नगरसेवक इफ्तीकार भाई,ब्लॉक अध्यक्ष जमील शेख,KDMC शहर प्रमुख फैजभाई उपस्थित होते.प्रमुख पाहुणेआणी मार्गदर्शक म्हणून SSGBAIC चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.तानाजी घाग यांनी आपल्या सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व भूमिकेच्या पाठी ठामपणे उभे राहून स्थानिक कॉग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत हातात हात घालून काँग्रेस ची ताकत केवळ विभागातच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात बळकट करण्याची प्रतिज्ञा घ्यावी असे आवाहन केले.डिसेंबर पासून प्रत्येक जिल्ह्यात सोनिया ब्रिगेडच्या कार्यालयाच्या स्थापना होतील,तेंव्हा काँग्रेस मधील मुख्य धारा आणि सर्व सेल च्या पाठी सोनिया ब्रिगेड खंबीरपणे उभी राहिली पाहिजे.आपण महाराष्ट्रातून सोनिया ब्रिगेड चे सैनिक म्हणून काँग्रेस च्या प्रत्येक चळवळीत पुढाकार आणि देशविघातक शक्तींना ठोस उत्तर देन्यासाठी कटीबद्द आहोत.आपला एकच नारा
**काँग्रेसमय हिंदुस्थान हमारा
हा संदेश महाराष्ट्रातून दिल्लीत गेला पाहिजे असे जाहीर आव्हान केले.



